दाक्षिणात्य अभिनेते महेश बाबू (Mahesh Babu) यांचे वडील कृष्णा घट्टामनेनी (Krishna Ghattamaneni) यांचे आज पहाटे ४ वाजता हैदराबाद येथे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. कृष्णा घट्टामनेनी हे एक सुप्रसिद्ध तेलुगू अभिनेता होते आणि त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. कृष्णा घट्टामनेनी एक अभिनेता तसेच एक यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माता होते. कृष्णा घट्टामनेनी यांना 2009 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा घट्टामनेनी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, मात्र राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या निधनानंतर त्यांनी काँग्रेस सोडली होती.
ज्येष्ठ टॉलिवूड अभिनेते कृष्णा घट्टामनेनी (Krishna Ghattamaneni) यांना सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. महेश बाबू यांची आई इंदिरा देवी यांचेही काही महिन्यांपूर्वी निधन झाले. यानंतर महेश बाबूवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कृष्णा घट्टामनेनी यांच्या निधनाबद्दल तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
ప్రముఖ చలన చిత్ర నటుడు, నిర్మాత అభిమానులు సూపర్ స్టార్ గా పిలుచుకునే సినీ హీరో కృష్ణ (శ్రీ ఘట్టమనేని శివరామ కృష్ణమూర్తి, 79) మరణం పట్ల ముఖ్యమంత్రి శ్రీ కె. చంద్రశేఖర్ రావు సంతాపాన్ని ప్రకటించారు.#SuperStarKrishna
— Telangana CMO (@TelanganaCMO) November 15, 2022
आई आणि वडिलांच्या मृत्यूपूर्वी, महेश बाबूचा मोठा भाऊ, रमेश बाबू यांचे 8 जानेवारी 2022 रोजी वयाच्या 56 व्या वर्षी निधन झाले. रमेश बाबू हे साउथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माता होते. रमेश बाबू किडनीच्या समस्येशी झुंज देत होते पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं . महेश बाबू वडिलांच्या खूप जवळचे होते, अनेकदा महेश बाबू वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे.
13 मे 1943 रोजी आंध्र प्रदेशातील बुरू पालेम गावात जन्मलेल्या कृष्णा यांचे खरे नाव शिव राम कृष्ण घट्टामनेनी (Shiva Ram Krishna Ghattamaneni) होते. कृष्णा घट्टमनेनी 1961 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. काही वेळातच तो आपल्या जबरदस्त अभिनयाने तेलुगू चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार बनला. कृष्णा घट्टामनेनी ॲक्शन पासून पौराणिक चित्रपटांपर्यंत सर्व प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केले होते.