टिओडी मराठी, मुंबई, दि. 6 मे 2021 – मुंबई येथील सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय,मुंबईच्या सचिवपदी (बांधकामे) अभियंता अनिलकुमार गायकवाड यांची आज महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनेक महत्वाची पदावर काम अनिलकुमार गायकवाड यांनी केलेले आणि सध्या एम.एस.आर.डी.सी.च्या हिंदु हृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गचे मुख्य अभियंता तथा सह व्यावस्थापकिय संचालक आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय येथे सचिव बांधकामाचा अतिरिक्त पदभार सांभाळला आहे. त्यांना उत्कृष्ट अभियंता म्हणून महाराष्ट्र शासनाने दोन वेळा गौरविले आहे.
अभियंता अनिलकुमार गायकवाड यांनी अनेक महत्वाचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. मुंबई मधील उड्डाण पूल, सी लिंक, मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, वैतरणा नदीवरील सर्वांत उंच लोखंडी पूल, दिल्ली येथील ‘महाराष्ट्र सदन’ वास्तू, मुंबई हाईकोर्टच्या इमारतीचं आधुनिक पद्धतीचे जतन आणि सध्या सुरू असलेलं महाराष्ट्रच्या मुख्यमंत्री यांचा महत्वकांक्षी प्रकल्प ‘समृध्दी महामार्ग’ असे अनेक प्रकल्प यशस्वी पूर्ण केलेले आहेत.