अमरावती :
“या पुढे वाट्याला गेल्यास पुन्हा माफ करणार नाही. पहिली वेळ आहे माफ करतो”, (Bachhu Kadu on controversy with Ravi Rana) अशा शब्दात बच्चू कडू यांनी रवी राणांना इशारा दिला आणि वादावर पडदाही पाडला. राणांनी माफी मागितली म्हणून आनंद व्यक्त करतो. राणांनी 2 पावलं मागे घेतली मी 4 पावलं घेतो”, असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. (Bachhu Kadu warned Ravi Rana)
“प्रहार आंडू पांडूचा पक्ष नाही. आम्ही उत्तर द्यायला कमी पडत नाही. कोणाच्या वाट्याला जात नाहीत, गेलं तर कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहत नाही”, असंही बच्चू कडूंनी ठणकावून सांगितलं.
“बच्चू कडू स्वतः 350 गुन्हे घेऊन लढतो. बाकी नेत्यासारखे कार्यकर्त्याला लढ म्हणत नाही. तसेच आज हे शक्ती प्रदर्शन नाही. आम्ही सैनिका सारखे जगतो. गर्दीत असणारे दर्दी महत्वाचे आहे, सगळे दर्दी असल्यानं बच्चू कडू 4 वेळा निवडणून येतो”, असंही ते म्हणाले.
राणा-कडू यांच्यातील नक्की वाद काय?
आमदार बच्चू कडूंनी गुवाहाटीला जाऊन 50 खोके घेतल्याचा आरोप राणा यांनी केला होता. तसेच कडू ‘तोडपाणी’ करणारा आमदार आहे, असा गंभीर आरोपही रवी राणांनी केला होता. या आरोपानंतर बच्चू कडूंनी आक्रमक होत रवी राणांना आव्हान दिलं होतं. “राणा एका बापाचा असेल तर त्याने पुरावा द्यावा. जर केलेला आरोप खरा ठरला तर त्याच्या घरी भांडी घासेन”, अशा शब्दात कडूंनी राणांना आव्हान दिलं होतं.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मध्यस्थीनंतर आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील वादावर पडदा पडला आहे. तसेच राणा यांनी आपले शब्दही मागे घेतले. यानंतर अमरावतीला (Amravati) परतल्यानंतर बच्चू कडू यांनी जाहीर बैठक घेतली. या बैठकीत कडू यांनी वादावर पडदा टाकला असला तरी राणा यांना इशाराही दिला आहे.
आमदार बच्चू कडू यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे:
आडनाव जरी कडू असलं तरी मी गोड आहे
पहिली वेळ असल्याने रवी राणांना माफी
राणांनी दोन पावलं मागे घेतली, आम्ही चार पावलं मागं घेतो
आमच्या वाटेला गेलात तर कोथळा काढू
दिव्यांगाच्या न्यायासाठी बच्चू कडू उभा
निर्णय कडू असतात पण काम गोड करता आलं पाहिजे
जाती पातीचं राजकारण करणार नाही, वेळ आली तर राजकारण सोडेन
लोकांच्या चेहऱ्यावरील समाधान आपण कमवलं आहे
हम छोटे है, लेकीन दिलदार है
प्रहार आंडु-पांडुचा पक्ष नाही
बच्चू कडू स्वतः 350 गुन्हे घेऊन लढतो