TOD Marathi

अभिनेता रितेश देशमुखने चाहत्यांसाठी (Riteish Deshmukh Upcoming Marathi Movie) मोठी घोषणा केली आहे. त्याची ही घोषणा म्हणजे चाहत्यांसाठी जणू दिवाळी गिफ्टच आहे. रितेशचा बहुचर्चित सिनेमा ‘वेड’ कधी प्रदर्शित होणार हे त्याने जाहीर केले असून यातील एक सरप्राइजही त्याने पोस्टरद्वारे सांगितलं आहे. हे सरप्राइज म्हणजे जिनिलिया या सिनेमाद्वारे तिच्या मराठी सिनेमातील डेब्यूसाठी (Genelia Deshmukh First Marathi Movie) सज्ज झाली आहे. या सिनेमाची आणखी एक खासियत म्हणजे ‘वेड’ सिनेमातून रितेश देशमुख दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.
रितेशने ही पोस्ट शेअर करताना म्हटले आहे की, ‘वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण केलेला वेडेपणा एखाद्या मुहूर्तावर जाहीर करायला काय हरकत आहे! आज दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छांसकट सादर करतोय तारिख आणि चित्रपटाचा फर्स्ट लूक. आमचं #वेड तुमच्यापर्यंत येतंय ३० डिसेंबरला तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असू द्या.’

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

तर दुसरी कडे अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने सोशल मीडियावर ‘वेड’ या तिच्या कमबॅक चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. तिने चित्रपटाचं पहिला लूक देखील शेअर केलं आहे. या चित्रपटाद्वारे जेनेलिया मराठीमध्ये पदार्पण करत आहे.पोस्टर शेअर करताना जेनेलियाने मराठीत लिहिले की, “माझा जन्म महाराष्ट्रात झाला. मी अभिनयाला सुरुवात केल्यानंतर हिंदी-तमिळ-तेलुगू अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट केले. प्रेक्षकांचं मला प्रचंड प्रेम मिळालं. रितेशच्या पहिल्या दिग्दर्शनातून मी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. मराठीत काम करताना मला पूर्ण वर्तुळात आल्यासारखे वाटते.”

रितेशने बुधवारी शेअर केलेल्या पोस्टमध्ये सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची तारीख आणि सिनेमाचं नवंकोरं पोस्टर दिसत आहे. या पोस्टमध्ये जिनिलिया आणि रितेश दोघेही दिसत आहेत. जिनियाचे डोळ्याच्या कडा काहीशा ओलावल्या असून रितेश धुम्रपान करताना दिसतो आहे. त्यामुळे हे ‘वेड’ नक्की कसले आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

रितेश आणि जिनिलियाने या सिनेमाचे एकूण तीन पोस्टर शेअर केले आहेत. या तिन्ही पोस्टरमधून ‘वेड’ची कहाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पोस्टरवरुन ही कथा प्रेम आणि विरहाची असावी असा अंदाज लावला जात आहे. दरम्यान नेमकं कथानक काय असेल हे ३० डिसेंबर रोजीच समजेल.या सिनेमातील आणखी एक महत्त्वाती बाब म्हणजे- संगीत. या सिनेमाद्वारे प्रेक्षकांना पुन्हा एकदा अजय-अतुल यांच्या संगिताची गोडी चाखता येणार आहे. या सिनेमात अभिनेत्री जिया शंकरही दिसणा आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज