TOD Marathi

आशिया कपच्या फायनलमध्ये भारतीय महिला टीमचा दबदबा, सातव्यांदा नावावर केलं चषक

संबंधित बातम्या

No Post Found

श्रीलंकेच्या पराभवासह भारतीय महिला संघाने आशिया चषकाच्या इतिहासात सातव्यांदा विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे आशिया चषकाचे आतापर्यंत 8 हंगाम झाले आहेत. यावेळी महिला आशिया चषक यजमान बांगलादेशमध्ये खेळला गेला. (Indian Women Cricket team won Asia cup for 7th time) अंतिम सामन्यासह सर्व सामने सिल्हेटमध्ये खेळले गेले. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, श्रीलंकेचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांच्या समोर टिकला नाही. श्रीलंकेने केवळ 9 धावांत दोन गडी गमावले. (Indian Women Cricket team defeated Srilanka)
क्षेत्ररक्षणातही भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. यानंतर वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने 3 खेळाडूंची विकेट मिळवत श्रीलंकेचा संघ पूर्णपणे गुडघ्यावर आणला. उर्वरित काम राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांनी केले. त्यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
अशाप्रकारे श्रीलंकेचा संघ 9 गडी गमावून केवळ 65 धावा करू शकला. 66 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघाने 8 गडी राखून सामना जिंकला.
टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती, पण 35 धावांवर आल्यावर दोन गडी बाद झाले. शेफाली वर्मा 5 आणि जेमिमा रॉड्रिग्सने 2 धावा करून बाद झाली. पण स्मृती मंधानाने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या साथीने डाव सांभाळला आणि सामना जिंकून परतली. मंधानाने 25 चेंडूत 51 धावांची जबरदस्त नाबाद खेळी खेळली. तर हरमनने 14 चेंडूत 11 धावा केल्या. तिच्या खेळीमुळे भारतीय संघाने 8.3 षटकातच 2 गडी गमावून 71 धावा करून सामना जिंकला.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज