Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
“आमचे चुलत भाऊ राजदादा…”; थेट राज ठाकरेंचा उल्लेख अन् सरकारला टोला

TOD Marathi

मुंबई:
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Prime Minister Narendra Modi) नक्कल करणे, राष्ट्रपतींचं नाव घेऊन खिल्ली उडवणारं भाष्य करणे यासारख्या आरोपावरुन त्याचबरोबरच उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारेे (Sushma Andhare) यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता सुषमा अंधारे यांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख करत सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीला आव्हानच दिलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रबोधन यात्रा सुरू आहे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party’s Prabodh Yatra). ज्या प्रबोधन यात्रेत यापूर्वीही उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)यांनी ठाण्यात जोरदार फटकेबाजी केली होती. यानंतर ही प्रबोधन यात्रा नवी मुंबईत संपन्न झाली.

यावेळी ठाकरे समर्थक नेते मंडळी मंचावर दिसून आली. यात माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत, खासदार राजन विचारे, उपनेत्या सुषमा अंधारे उपस्थित होते (Arvind Sawant, Rajan Vikhare,Sushma Andhare). यामध्ये भाषणं तर सर्वच नेत्यांनी दिली मात्र त्यातही सुषमा अंधारे यांनी आपल्या खास शैलीमध्ये दिलेलं भाषण आणि त्यामधून केलेल्या टोलेबाजीला ठाकरे समर्थकांनी चांगलीच दाद मिळाल्याचं पहायला मिळालं.

काही दिवसापूर्वी ठाण्यात झालेल्या कार्यक्रमानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतरही सुषमा अंधारे यांनी अगदी पूर्वीप्रमाणेच शाब्दिक कोट्या करत सत्ताधारी शिंदे गटाला लक्ष्य केलं. विशेष म्हणजे दाखल झालेल्या गुन्ह्याचा संदर्भ देत त्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उल्लेख चुलतभाऊ असा केला आणि त्यांना वेगळा कायदा लागू होतो का? असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारला. कायद्यानुसार सर्वांना नियम सारखे हवेत असं असताना राज ठाकरे यांच्या नकलांवरुन कधी गुन्हे दाखल झाले का? असा सवाल करत माझ्यासाठीच वेगळा नियम का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

“आमचे राज दादा, ते आमचे चुलत भाऊ आहेत. एकनाथ भाऊ सख्खे भाऊ आहेत,” असं सुषमा अंधारेंनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. त्यानंतर अंधारे यांनी, “राज दादा आमचे चुलत भाऊ. आमचे राज दादा एवढ्या सगळ्या मिमिक्र्या करतात त्या वेळी काय करता? राज भाऊंवर किती केसेस दाखल केल्या? तुम्ही विचारलं पाहिजे,” असं म्हटलं. इतकच नाही तर अगदी अस्खलित इंग्रजीमध्ये अंधारे यांनी, “कायद्यामधील तिसऱ्या कलमातील १४ व्या तरतुदीनुसार कायद्यासमोर समान आहेत,” असं एकदम वकिली थाटात सांगितलं.

एकंदरीत दसरा मेळावा असो किंवा महाप्रबोधन यात्रा सुषमा अंधारे ज्या ज्या मंचावर गेल्या तो मंच त्यांनी गाजवला आणि त्या माध्यमातून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना ऊर्जा नक्कीच मिळाली असेल.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज