राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आज ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘अमृत महोत्सव’ सोहळा संपन्न झाला. (Sharad Pawar talks about Chhagan Bhujbal on his birthday program) या कार्यक्रमात छगन भुजबळ यांच्या जीवनावरील ‘बहुजननायक छगन भुजबळ’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी छगन भुजबळ व मीना छगन भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला, ज्येष्ठ लेखक-कवी डॉ. जावेद अख्तर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार राजेश टोपे, आमदार सचिन अहिर, आमदार कपिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होता. (Uddhav Thackeray, Farukh Abdulla, Javed Akhtar, Ajit PAwar, Balasaheb Thackeray and many leaders were present in this program)
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या आयुष्यातील राजकीय संघर्षाचा आलेख मांडला. गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विकासाच्या कामाला प्रोत्साहन देणारा नेता म्हणून आपण त्यांना ओळखतो. शून्यातून व्यक्तिमत्व कसे उभे राहते याचा आदर्श उदाहरण म्हणजे छगन भुजबळ आहेत, असे कौतुकोद्गार शरद पवार यांनी काढले. छगन भुजबळ यांनी केलेल्या उत्तम कामाची ओळख पटवून देताना शरद पवार यांनी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाची आठवण करून दिली. दिल्लीच्या सौंदर्यामध्ये भर टाकेल अशी ती वास्तू बांधण्यात आली आहे. त्याशिवाय नाशिक जिल्ह्याचा चेहरा बदलण्यामध्ये भुजबळांचे योगदान प्रचंड आहे याची नोंद कायम राहील, असे ते म्हणाले.