शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगानं स्वरूपात गोठवलं आहे. (Shivsena party symbol freezes by Election Commission) त्याबरोबर शिवसेना हे नावही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला वापरता येणार नाही आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri East bye election) उद्धव ठाकरे यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मनाई केली आहे. यावरती आता खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया देत निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना अरविंद सावंत म्हणाले, “ईडी, सीबीआयनंतर स्वायंत्त संस्था असलेला निवडणूक आयोगही वेठबिगार झाला आहे. आयोगाकडे कोणतरी तक्रार करत, त्याची माहिती न घेता चार तासात धनुष्यबाण चिन्हाबाबत आदेश दिला जातो. कोणाच्या आदेशानुसार हे सर्व सुरु आहे. देश हुकूमशाहीकडे चालला आहे,” असा इशारा त्यांनी दिली. शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. खासदार अरविंद सावंत यांनी देखील यावर प्रतिक्रीया दिली आहे. (MP Arvind Sawant criticized EC)
अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी उमेदवार दिला आहे आणि उमेदवार दिला असताना निवडणुकीत धनुष्यबाणाव्यतिरिक्त वेगळे चिन्ह घ्यावं लागणार आहे. शिंदे गटाने या निवडणुकीत उमेदवार दिला नाही, त्यामुळे अंधेरी निवडणुकीपर्यंत तरी त्यांना फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे आता सोमवारी या संदर्भात काय घडामोडी घडतात, हे बघणं औत्सुकत्याचं ठरणार आहे.
दोन्ही गटांनी तातडीने बोलावली महत्त्वाची बैठक:
शिवसेनेचं धनुष्यबान हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटांनी तातडीने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. (Important meeting called by Uddhav Thackeray group and Eknath Shinde group) दोन्ही बाजूंना त्या त्या गटाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास या बैठका होणार आहेत. निवडणूक आयोगाने सोमवार पर्यंत तीन पर्याय मागवले आहेत. त्याच्या पैकी कुठला पर्याय द्यायचा? पुढची कार्यवाही कशा पद्धतीने करायची? पुढं काय करायचं? अशा विविध विषयांवर या दरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी उमेदवार दिला आहे आणि उमेदवार दिला असताना निवडणुकीत धनुष्यबाणाव्यतिरिक्त वेगळे चिन्ह घ्यावं लागणार आहे. शिंदे गटाने या निवडणुकीत उमेदवार दिला नाही, त्यामुळे अंधेरी निवडणुकीपर्यंत तरी त्यांना फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे आता सोमवारी या संदर्भात काय घडामोडी घडतात, हे बघणं औत्सुकत्याचं ठरणार आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोघांच्या बैठकीत आज काय घडणार? पुढची रणनीती काय ठरणार? याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कायदे पंडितांशी देखील चर्चा करणार असल्याची माहिती आहे.