भंडारा:
राजकारणात एकमेकांचे विरोधक तर खाजगी आयुष्यात एकमेकांचे मित्र समजले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भंडाऱ्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यामध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. (Maharashtra Congress President Nana Patole met DCM Devendra Fadnavis in Bhandara) या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. शिंदे-फडणवीस (Eknath Shinde, Devendra Fadnavis) सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती. आता खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर आले आहे.
भंडाऱ्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. (DPDC Meeting Bhandara) या बैठकीला पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. या बैठकीनंतर पाच मिनिट फडणवीस आणि पटोले (Nana Patole) यांच्यामध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर या बैठकीबाबत आता चर्चेला उधाण आलेले आहे.
साकोली हा नाना पटोले (Nana Patole) यांचा मतदारसंघ भंडारा जिल्ह्यात आहे. त्यांनी आपल्या क्षेत्रासाठी अतिरिक्त निधी मागण्यासाठी फडणवीस यांची घेतली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. किंवा अजून कोणत्या मोठ्या राजकीय घडामोडीवर चर्चा तर झाली नव्हती याबाबतही उलटसुलट चर्चेला उधाण आलेलं आहे. त्यामुळे ही गुप्त भेट राज्यात काही नव्या राजकीय घड़ामोड़ी घडवणार का? हे पाहावे लागणार आहे.