राज्यातील सत्ता संघर्षाच्या दरम्यान शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेचे निष्ठावंत मानले जाणारे उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी असलेले एकनाथ शिंदे यांनी वेगळी वाट धरली. शिवसेनेच्या परंपरेचा भाग असलेला दसरा मेळावा कोणाचा होणार? याबद्दलही बरीच मोठी चर्चा रंगली होती. यानंतर आता दसरा मेळावे दोन होणार आहेत हेही स्पष्ट झालं. शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार आहे तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होणार आहे. दोन्ही बाजूंनी दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून लाखाच्या वर कार्यकर्ते, पदाधिकारी यावेत यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.
दरम्यान, दोन्ही गटाचे दसरा मेळाव्याचे टिझर देखील जारी करण्यात आले आहेत. काल एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून त्यांच्या दसरा मेळाव्याचं टीझर शेअर केलं होतं.
#दसरा_मेळावा_२०२२ pic.twitter.com/mCQZs6rufq
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 29, 2022
त्यानंतर आता शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचं टीझर जारी करण्यात आलं आहे. दोघांच्या टीझर मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ही समान गोष्ट आहे.
एक नेता, एक झेंडा, एक मैदान…
शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर
५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा. pic.twitter.com/FbulJpw2mA— ShivSena – शिवसेना (@ShivSena) September 30, 2022
एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या टीझरमध्ये आपण बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक आहोत असा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर तसाच काहीसा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या टीझर मध्ये देखील करण्यात आलेला आहे.