महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्यासह पहिल्यांदा बंड करून बाहेर पडलेल्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत त्याचबरोबर शिवसेनेवर कुणाचा हक्क राहणार यांसारख्या प्रश्नांची उत्तर या सुनावणीच्या निकालातून मिळणार आहेत. या सुनावणीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होणार असून यामध्ये आज महत्त्वपूर्ण निर्णय येण्याची शक्यता आहे. 16 आमदारांमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचाही समावेश आहे. मात्र, न्यायालयातील या सुनावणीपूर्वी शिंदे गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची निवड करण्यात आल्याची माहिती मंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी दिली आहे.
त्यामुळे सुप्रीम कोर्टात (Supreme Court) होत असलेल्या सुनावणीपूर्वीच शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी हा मोठा गौप्यस्फोट केल्याने ठाकरेंचं (Uddhav Thackeray) टेन्शन वाढलं असण्याची शक्यता आहे.