शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena chief Balasaheb Thackeray) यांचे निकटचे सहकारी आणि ज्यांनी बरीच वर्ष बाळासाहेबांच्या सेवेसाठी दिली असे चंपासिंग थापा (Champasing Thapa) यांनी शिंदे (Eknath Shinde) गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे. बाळासाहेबांचे विश्वासू असलेले चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते.
शिवसेनेत बंड झाल्यापासून दोन गट तयार झालेले आहेत, दोन्ही गट आमचीच खरी शिवसेना असेही म्हणत आहेत. आणि या संदर्भातला वाद हा कोर्टात गेला आहे. त्यामुळे आमदार, खासदार, मंत्री, कार्यकर्ते पदाधिकारी विभागले गेले आहेत. अनेक कट्टर समजले जाणारे नेते देखील शिंदे गटात गेले आहेत.
अशातच उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्का देणारी ही बातमी आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार 12 खासदार यांच्यासह राज्यभरातील काही पदाधिकारी देखील गेले आहेत.