पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज त्यांचा ७२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. सामान्य नागरिकांपासून तर सेलिब्रिटी पर्यंत सगळेच पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत आहेत. आजचा दिवस अनेक अर्थाने खास आहे.भारताची 70 वर्षांची प्रतीक्षा आज संपली. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त नामिबियातून आठ चित्ते आणण्यात आले आहेत.
देशासाठी काम करणारे पीएम मोदी हे एखाद्या सुपरस्टारपेक्षा कमी नाहीत. बॉलिवूड स्टार्सला (Bollywood stars) पाहण्यासाठी सर्वसामान्य जनता थिएटरमध्ये जाते. पण तुम्हाला माहित आहे का की आमचे बॉलिवूड स्टार्स ही पीएम मोदींचे जबरा चाहते आहेत. मात्र सर्वसामान्यांसोबतच सुपरस्टारही त्याचे चाहते आहेत.
अक्षय कुमार (Akshay Kumar)
बॉलिवूडचे खिलाडी कुमार हे पंतप्रधानांचे सर्वात मोठे चाहते मानले जातात. अक्षय कुमारने (Akshay Kumar) नरेंद्र मोदींची पहिली अराजकीय मुलाखत घेतली आहे. पंतप्रधानांची ही मुलाखत मोठ्या प्रमाणात पाहण्यात आली. त्यावेळी हा अभिनेता अक्षय कुमार खूप चर्चेत होता.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)
सुपरस्टार अमिताभ बच्चन गुजरात टुरिझमच्या एड्समध्ये दिसतात. गुजरातच्या पर्यटनाला चालना देण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. बिग बींनीची पहिली भेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत गुजरात पर्यटनासाठी झाली होती.
सलमान खान (salman khan)
सलमान खान अनेकदा नरेंद्र मोदींना भेटत असतो. सुपरस्टार्सना पंतप्रधानांचा स्वभाव खूप आवडतो. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
कंगना राणौत (Kangana Ranaut)
कंगना राणौत पंतप्रधान नरेंद्र मोदींची खूप मोठी फॅन आहे. ती ट्विटरवरून प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधानांना फॉलो करते. सीएए, एनआरसी आणि किसान विधेयक यांसारख्या मुद्द्यांवरही कंगना पंतप्रधान मोदींना पाठिंबा देताना दिसली आहे.
अनुपम खेर (Anupam Kher)
अभिनेते अनुपम खेर हे पंतप्रधान मोदींचे खूप समर्थन करताना दिसत असतात. दोघेही अनेकदा एकमेकांना भेटले आहेत. अनुपम खेर अनेकदा सोशल मीडियावर पीएम मोदींच्या योजनांचे कौतुक करताना दिसतात.