सातारा : महाराष्ट्रातील तरुण सैन्यदलाच्या माध्यमातून देशसेवा बजावत असतात. सातारा जिल्ह्यातील तरुण मोठ्या संख्येनं इंडियन आर्मी, भारतीय नौदल, भारतीय हवाई दल आणि सैन्याच्या इतर सुरक्षा दलांमध्ये मोठ्या संख्येनं कार्यरत आहेत. सातारा जिल्ह्यातील अपशिंगे मिलटरी या गावाला सैनिकांचं गाव म्हणून देखील ओळखलं जातं. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सुरज शेवाळे या जवानाच्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे. भारतीय स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव देशभर जल्लोषात साजरा करण्यात आला. सुरज शेवाळे या जवानानं काश्मीरमध्ये चार्टर्ड विमानातून २२ हजार फूट उंचीवरुन उडी घेत तिरंगा फडकवण्याचा निर्धार यशस्वीरित्या पूर्ण केला. सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी देखील सुरज शेवाळे याचं अभिनंदन केलं आहे. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनीही सुरज शेवाळे (Suraj Shewale Satara) यांचा व्हिडीओ त्वित करून अभिनंदन केलं आहे.
पाटणचे सुपुत्र पॅरा रेजिमेंटचे कमांडो सुरज शंकर शेवाळे यांनी काश्मीर येथे २२ हजार फूट उंचीवर चार्टर्ड विमानातून उडी घेत आपला तिरंगा राष्ट्रध्वज फडकावला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सुरज शेवाळे यांनी दाखविलेले हे धाडस आणि देशप्रेम अभिमानास्पद आहे.त्यांचे अभिनंदन करतो. pic.twitter.com/ohKnUjptEa
— Shambhuraj Desai (@shambhurajdesai) August 17, 2022
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Azadi ka Amrit Mahotsav) पॅरा रेजिमेंटचे कमांडो आणि साताऱ्याचे सुपूत्र सूरज शेवाळे याने काश्मीरमध्ये चार्टर्ड विमानातून २२ हजार फूट उंचीवरून उडी घेत हवेत तिरंगा फडकवला. (Suraj Shewale Hoisted Flag at the Height of 22000 feet) त्याचा हवेत तिरंगा फडकवतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सुरज हे सातारा जिल्ह्यातील पाटण मधील चोपदारवाडी गावचे रहिवासी आहेत. 2017 साली तो सैन्यात भरती झाला आहे. तो सध्या जम्मू – काश्मीरमध्ये कार्यरत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण हवेत उंचावर तिरंगा फडकवण्याचा निर्धार त्यांनी केला होता.