मुंबई :
अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठी घोषणा केली आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारानंतर आज मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पार पडली. यामध्ये दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आली. (Govt took decision to support Farmers) तर दुसरा निर्णय मुंबई मेट्रो संदर्भात घेण्यात आला. (Mumbai Metro)
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली. (CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis) राज्यात आत्तापर्यंत तब्बल 15 लाख हेक्टर शेतीचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे. यासह राज्य मंत्रिमंडळाने आणखी दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
मंत्रिमंडळ निर्णय
● अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना राज्य शासनाचा मोठा दिलासा. दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत, एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत करणार
● कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-३ प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता
● रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास मान्यता