निवडणूक आयोगासमोर ठाकरे आणि शिंदे गटाच्या लढाईचा नवा अंक आज पाहायला मिळणार आहे. यामध्ये आयोगाकडे शिवसेना आज पहिलीच मागणी स्थगितीची करणार आहे. शिंदे गटाला आयोगाकडे धाव घेण्याचा हक्कच नाही, अशी भूमिका ठाकरे गटाच्या वतीने मांडण्यात आली. नवी दिल्लीत शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. (Anil Desai PC in Delhi)
सुप्रीम कोर्टात सुनावणी होत नाही, तोपर्यंत आयोग निर्णय घेऊ शकत नाही, यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. त्यामुळे कोर्टातील निर्णयानंतरच आयोगाला निर्णय घेता येईल. शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष असून या संदर्भातली सगळी आवश्यक माहिती कागदपत्र आयोगाला सादर केली जातील. विधिमंडळ पक्ष आणि मूळ पक्ष यामध्ये फरक आहे. असंही अनिल देसाई म्हणाले. (Thackeray Vs Shinde in Election Commission now)
विरोधी पक्ष म्हणून आम्ही एकत्र आहोत. सभागृहात वेळोवेळी आम्ही आमची बाजू मांडलेली आहे. स्थगन प्रस्ताव मांडताना आम्ही आमची बाजू मांडली, यावेळी आम्हाला विरोधी पक्षांचीही मदत लाभली. असंही अनिल देसाई म्हणाले.
त्यामुळे आता या सगळ्या घडामोडी होत असताना धनुष्यबाणासाठी ‘सामना’ पाहायला मिळते.