राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) विराजमान झाले. आणि महिनाभरातच एकनाथ शिंदे यांनी एकूण चार दिल्ली दौरे केले आणि आज पाचव्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होणार आहेत. मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर ८ जुलैला एकनाथ शिंदे यांनी पहिला दिल्ली दौरा केला होता. 19 जुलैला केलेल्या दुसऱ्या दिल्ली दौऱ्यात शिंदे गटात सामील झालेल्या खासदारांची भेट घेतली होती. त्यानंतर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Former President Ramnath Kovind) यांच्यासाठी आयोजित एका डिनर पार्टीत सहभागी होण्यासाठी 22 जुलैला तिसरा दिल्ली दौरा झाला होता. त्यानंतर द्रौपदी मुरमु यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी चौथा दिल्ली दौरा 24 आणि 25 जुलै दरम्यान केला होता. या चार दौऱ्यानंतर मुख्यमंत्री आज पुन्हा पाचव्यांदा दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. (CM Eknath Shinde Delhi) मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर 26 दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटून गेल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्री दिल्लीत पोहोचल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union HM Amit Shah) आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP President J. P. Nadda) यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळाचे देखील थोड्याच वेळात बैठक होत आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी कोर्टात असलेल्या प्रकरणाचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काही संबंध नाही, असं अनेकदा सांगितलेलं आहे. राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी येत्या एक ऑगस्टला कोर्टात होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि 1 ऑगस्टला होणारी सुनावणी या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याला आणखीन महत्त्व प्राप्त होत आहे.