विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar Press Conference) यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी अतिवृष्टीग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या “काळजावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं” या विषयावरही मिश्कील टिपणी अजित पवार यांनी यावेळी केली. ओला दुष्काळ घोषित करा या मागणीसह महाविकास आघाडी पुढे टिकणार का, ओबीसी आरक्षण, (OBC Reservation in Maharashtra) मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भूमिका या सगळ्यांवरही त्यांनी भाष्य केलं.
मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावरही त्यांनी भाष्य केलेलं आहे. दिल्ली दौरा करा मात्र राज्यातल्या जनतेकडेही लक्ष द्या, असं म्हणताना हवामान विभागावरही अजित पवारांनी टीका केली. रेड अलर्ट म्हणतात मात्र पाऊस काय कुठे पडलाच नाही असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे;
● अतिवृष्टी ग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर
● मंत्रिमंडळ विस्तार न होणं हा जनतेचा अपमान
● सरकारना विधिमंडळ अधिवेशन बोलवावं
● बहुमत असूनही मंत्रिमंडळाचा विस्तार का करत नाही?
● पूरग्रस्त भागाची पाहणी करणार
● दिल्लीत दौरे करा मात्र राज्यातल्या जनतेकडे ही पहा
● पुरामुळे मोठं नुकसान, तातडीने अधिवेशन बोलावलं पाहिजे
● ओबीसींच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय
● हवामान खात्याचा अंदाज अचुक असायला हवा
● एकनाथ शिंदे यांनी आमच्यासोबत सुरू केलेल्या कामांना ते स्थगिती देत आहेत
● मागील सरकारच्या योजना स्थगित का केल्या जात आहेत?
● हे लोक ताम्रपट घेऊन आले आहेत का? हे पण जाणारच आहेत
● सरकारने अनेक निधी रद्द केले
● प्रक्रिया सुरू असताना निवडणुका का पुढे ढकलल्या?
● कुठे दगड ठेवला आणि कुठे धोंडा ते सभागृहात सांगतो
● काही पक्ष ओबीसी आरक्षणाचे श्रेय घेत आहेत, पण ओबीसी आरक्षणाची मागणी सर्वांची होती
● मुख्यमंत्र्यांना भेटल्यास त्यांच्याकडे जाणार असं होत नाही
● 2024 च्या निवडणुकीत तरुणांना संधी मिळेल
असे विविध मुद्दे मांडत अजित पवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आणि सरकारकडून अपेक्षाही व्यक्त केल्या.