सध्या राज्याच्या राजकारणात अनेक वेगवान घडामोडी सुरू आहेत. या दरम्यान विविध नेत्यांच्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहेत. विशेषतः शिंदे गट जेव्हा सुरतला होता त्यानंतर काही काळ गुवाहाटीला होता आणि त्यानंतर हा गट मुंबईत आला. पुढे एकनाथ शिंदे (Ekanath Shinde CM) मुख्यमंत्री झाले, त्यानंतरच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याद्वारे एक नवी राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली. ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्य नेतेपदी तर दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना प्रवक्तेपदी आणि अन्य काही लोकांना नेतेपदी, उपनेतेपदी नेमण्यात आला. याच संदर्भात शिवसेना ही ठाकरेंचीच होती, आहे आणि राहील असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं होतं.
आता शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी एक कॉल रेकॉर्डिंग शेअर केलेलं आहे. (Shivsena MP Priyanka Chaturvedi Shared a Call Recording) त्यांनी म्हटल्याप्रमाणे तो व्हिडिओ शिंदे गटाचे एक व्यक्ती आणि शिवसेनेचे एक पदाधिकारी यांच्या दरम्यानचा संवाद आहे. यामध्ये एक व्यक्ती सदर पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या वतीने काम कसं करण्यात येईल, काय करण्यात येईल हे सांगतोय. मात्र, तो पदाधिकारी हे सगळं काम करण्यास नकार देत आहे. युवा सेनेची कार्यकारिणी आपण तयार करत आहोत. यामध्ये आपण सोबत काम करूया. असही समोरची व्यक्ती म्हणताना दिसत आहेत.
कॉल रेकॉर्डिंगचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून याबाबत शिंदे गटाच्या वतीने काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागेल.