नवी दिल्ली : देशातील चित्रपट प्रेमींना राष्ट्रीय पुरस्कारांची नेहमीच उत्सुकता असते. चित्रपट निर्माते दिग्दर्शक लेखक अभिनेते यांच्यासाठी हे पुरस्कार फार महत्त्वाचे ठरतात. त्या कलाकृतीवर कौतुकाची थाप पुरस्काराने मिळत असते. मराठी चित्रपटांचा या पुरस्कारांमध्ये नेहमीच डंका वाजत आलेला आहे. त्यातच आता आणखी एका चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटवली आहे.
दिग्दर्शक शांतनु रोडे यांच्या गोष्टी एका पैठणीची या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. गायनात राहुल देशपांडे मीही राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटवली आहे.
गोदाकाठ आणि अवांछित या चित्रपटांसाठी अभिनेते किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटचा पुरस्कार विवेक दुबे यांच्या ‘फनरल’ला जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार टकाटक या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अनिश गोसावीला जाहीर झाला आहे.
दरम्यान सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अजय देवगणला ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटासाठी तर अभिनेता सूर्याला ‘सूरराय पोट्रू’ साठी जाहीर झाला आहे.