मुंबई : गणेशोत्सव अवघ्या तोंडावर येऊन ठेपला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून गणेशोत्सवासाठी निर्बंध होते. मात्र पहिल्यांदाच जल्लोषात हा सोहळा आता पार पडणार आहे. शिंदे फडणवीस सरकारनही काल गणेशोत्सववरील सर्व निर्बंध हटवल्याच स्पष्ट केल. मात्र आता प्रशासनाकडून काही अनुचित प्रकार घडू नये तसेच पर्यावरणाला हानी पोहचू नये यासाठी काही तातडीन पाउले उचलली जात आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेने काही सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. यंदा कोविड कालावधीनंतर होणाऱ्या यंदाच्या गणेशोत्सवासाठी विशेष बाब म्हणून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींना परवानगी देण्यात आली आहे. पण 2023 पासून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांवर बंदी आणण्यात येणार आहे.
दरम्यान यंदाच्या वर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना परवानगी देण्यात आली असली तरी पुढच्या वर्षीपासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात त्यावर पूर्णतः प्रतिबंध असणार घालण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शाडू मातीसारख्या पर्यावरणपूरक घटकांपासून तयार केलेल्य गणेश मूर्तींचीच खरेदी आणि विक्री करणे बंधनकारक असणार आहे.