शिवसेना विरुद्ध शिंदे गट या सुनावणीला आता सुप्रीम कोर्टात सुरुवात झाली आहे. (Shivsena Vs Eknath Shinde in supreme court) ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांच्याकडून युक्तिवाद केला जात आहे. राज्यातील सत्ता संघर्षावर ही अतिशय महत्त्वाची सुनावणी होत आहे. कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू मांडत आहेत. या सुनावणीकडे फक्त शिवसेना आणि शिंदे गटाचे नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं आहे. कालच एकनाथ शिंदे यांची दिल्लीत 12 खासदारांनी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं होतं. त्यांच्या पत्रावर लोकसभा अध्यक्षांनी खासदार राहुल शेवाळे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड केल्याचे सर्क्युलर देखील काढलं होतं. त्यामुळे या सुनावणीवर काय होतं याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. (Loksabha speaker appointed Rahul Shewale as group leader of Shivsena)
जे काही झालं, ते लोकशाही विरोधी आहे. व्हिपचं उल्लंघन केल्याने बंडखोर अपात्र आहेत. अचानक पक्षातून बाहेर पडलेल्यांना कोणतीही सूट नाही, असा युक्तिवाद करत आहेत. सोबतच अपात्रतेची टांगती तलवार असताना शपथविधी कसा काय होऊ शकतो? असा देखील युक्तिवाद कपिल सिब्बल करत आहेत.