TOD Marathi

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी आता शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. (Shivsena leader Ramdas Kadam resigned from his position as Shivsena leader) रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना एक खरमरीत पत्र लिहून आपली नाराजी जाहीर केली नेतेपदाचा राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे. शिवसेना प्रमुखांचं निधन झाल्यानंतर नेतेपदाला कोणतीही किंमत राहिली नसल्याची खंत रामदास कदम यांनी पत्रातून जाहीर केली आहे. महत्वाचं म्हणजे बंडखोर आमदारांमध्ये रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे देखील आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. (CM Eknath Shinde comments over resignation of Ramdas Kadam)

“मी रामदास कदम यांच्याशी बोलणार आहे. आमदार योगेश कदम पहिल्या दिवसापासून आमच्यासोबत आहे, याबद्दल सर्वांना माहिती आहे. रामदास कदम यांच्या शुभेच्छा आधीपासूनच आमच्यासोबत होत्या,” असं एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

रामदास कदम पत्रात म्हणतात,

“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्त केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेतेपदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पहायला मिळालं,” असं म्हणत रामदास कदम यांनी आपल्या पत्राच्या सुरुवातीलाच नाराजी व्यक्त केली आहे.

“आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला व माझ्या मुलाला म्हणजेच आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानित करण्यात आले,” असंही रामदास कदम यांनी पत्रात म्हटलं आहे.

“विधानसभेच्या निवडणुकीआधी आपण मला अचानक मातोश्रीवर बोलवून घेतले आणि मला आदेश दिले की, यापुढे तुमच्यावरती कोणतीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोणी काही बोललं, तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही. मीडियासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही. यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही,” असंही रामदास कदम या पत्रात म्हणतात.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज