मुंबईः राष्ट्रपदी पदासाठी NDA च्या उमेदवार (Presidential Candidate Draupadi Murmu on Mumbai Tour) या आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने देखील पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र मुंबई दौऱ्यावर आल्यावर द्रौपदी मुर्मू या मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार की नाही, याबाबतच्या चर्चांना पेव फुटलं आहे. द्रौपदी मुर्मू थोड्याच वेळात मुंबईत पोहोचतील. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद झाली. कॅबिनेट बैठकीत झालेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती यावेळी दिली गेली. यावेळी पत्रकारांनी द्रौपदी मुर्मू यांची आणि उद्धव ठाकरे यांची भेट होईल की नाही, यावर थेट देवेंद्र फडणवीसांनाच प्रश्न विचारला असता फडणवीसांनीही स्पष्ट उत्तर दिलं. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? द्रौपदी मु्र्मू आणि उद्धव ठाकरे यांची भेट होईल की नाही, असा प्रश्न राजकीय वर्तुळाला पडला असताना देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं आहे. (Devendra Fadnavis talks on meeting between Draupadi Murmu and Uddhav Thackeray) ‘द्रौपदी मुर्मू आज मुंबईत येत आहेत. त्यांची बैठक होणार आहे. त्यांचा कार्यक्रम माझ्याकडे आला आहे. त्यात इतर कुठली भेट नाही. त्यामुळे त्या कुणाला भेटतील याची माहिती नाही. त्यांचे प्रचारप्रमुख आणि उमेदवारांनी हा निर्णय घेतला आहे.’
एकनाथ शिंदे म्हणाले….
एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, शिंदे गटातील सर्व आमदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करतील. आमदारांसह खासदारही मतदान करतील. मुर्मू यांना ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचं स्वागत आहे.