मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येत आहे. (NCP to contest BMC election, NCP Chief Sharad Pawar took review and addressed party activists) या निवडणुकीसाठी स्वतः शरद पवार सक्रिय झाले असून कोण सोबत येईल, येणार नाही याचा विचार न करता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आदेश त्यांनी काढलेत. वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली, यावेळी त्यांनी हे आदेश दिलेत. (NCP meeting at YB centre Mumbai) याशिवाय मुंबई शहरात आपण स्वतः पक्षाला वेळ देणार असून मुंबई महापालिकेच्या सर्व भागात तयारी करण्यात यावी, प्रत्येक वार्डमधील परिस्थितीचा अहवाल तयार करण्यात यावा अशाही सूचना दिल्याचं कळतंय.
या बैठकीत शरद पवार यांच्याकडून नवाब मलिक यांचा देखील उल्लेख करण्यात आला. विशेष म्हणजे विरोधात आवाज उठवला म्हणून मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणाले. अजूनही नवाब मलिक यांच्या विरोधात ठोस पुरावे सादर होऊ शकले नाहीत, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगिले.