मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं आगमन नागपुरात झालं. त्यानंतर ते गडचिरोलीकडे रवाना झाले आहेत. (CM Ekanath Shinde DCM Devendra Fadnavis on Gadchiroli tour to review flood situation) मुख्यमंत्री गडचिरोलीत आलेल्या पूर परिस्थितीची पाहणी करणार असून त्या संदर्भात आढावा घेणार आहेत. नागपुरात दाखल झाल्यानंतर विभागीय आयुक्तांकडून पूर्व विदर्भातील परिस्थितीची माहिती घेतली आणि त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी गडचिरोलीकडे प्रयाण केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह नागपुरात आलो असता, विभागीय आयुक्तांकडून पूर्व विदर्भातील स्थितीची माहिती घेतली, नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आणि त्यानंतर गडचिरोलीकडे प्रयाण केले.@mieknathshinde pic.twitter.com/5kqU2oxNHG
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 11, 2022
मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच गडचिरोली दौरा आहे. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये ते गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे त्यांनी अनेक वेळा गडचिरोली जिल्ह्याला यापूर्वीही भेटी दिलेल्या आहेत. (Ekanath Shinde was guardian minister of Gadchiroli)
महाराष्ट्रात सर्वत्र गेले काही दिवस जोरदार पाऊस पडतोय. विदर्भातही जोरदार पाऊस पडतोय आणि या सततच्या पावसामुळे विदर्भातील काही नद्या ओसंडून वाहत आहेत. यामध्येच गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी त्यासोबतच आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गडचिरोलीत दाखल होत आहेत. संबंधित यंत्रणेशी मुख्यमंत्री स्वतः संपर्कात असून स्थानिक ठिकाणी भेटून आढावा देखील घेणार आहेत.