धावपटू पी टी उषा, प्रसिद्ध संगीतकार इलय राजा, चित्रपट कथा लेखक विजयेंद्र प्रसाद, वीरेंद्र हेगडे यांची राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. या चार जणांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड झालेली आहे. (Hon. President of India appointed P T Usha, members of Rajyasabha ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीटी उषा, व्ही. विजयेंद्र प्रसाद गरु, वीरेंद्र हेगडे आणि इलैया राजा यांचे राज्यसभेसाठी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. (PM Narendra Modi Congratulates newly appointed Rajyasabha members by President of India)
पंतप्रधान मोदी यांनी पीटी उषा यांच्यासाठी ट्वीट करत लिहिले आहे की,
पीटी उषाजी या प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेत. क्रीडा क्षेत्रातील त्यांची कामगिरी सर्वत्र ओळखली जाते, नवोदित खेळाडूंना गेल्या काही वर्षांत मार्गदर्शन करणारे त्यांचे कार्य तितकेच प्रशंसनीय आहे. राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
സവിശേഷയായ പി ടി ഉഷ ജി ഓരോ ഇന്ത്യക്കാരനും പ്രചോദനമാണ്. സ്പോർട്സിലെ അവരുടെ നേട്ടങ്ങൾ പരക്കെ അറിയപ്പെടുന്നു. വളർന്നുവരുന്ന അത്ലറ്റുകൾക്ക് കഴിഞ്ഞ കുറേ വർഷങ്ങളായി മാർഗദർശനം നൽകുന്ന അവരുടെ പ്രവർത്തനവും ഒരുപോലെ പ്രശംസനീയമാണ്. pic.twitter.com/b89B7laVAy
— Narendra Modi (@narendramodi) July 6, 2022
व्ही. विजयेंद्र प्रसाद गरू यांच्या राज्यसभेसाठी नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी लिहिले की,
व्ही. विजयेंद्र गरू हे अनेक दशकांपासून सर्जनशील जगाशी निगडीत आहेत. त्यांच्या कार्यातून भारताच्या गौरवशाली संस्कृतीचे दर्शन घडले आहे आणि जागतिक स्तरावर त्यांचा ठसा उमटवला आहे. राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
శ్రీ వి.విజయేంద్ర ప్రసాద్ గారు దశాబ్దాలుగా సృజనాత్మక రంగంతో ప్రత్యేక అనుబంధం కలిగి ఉన్నారు. అతని రచనలు భారతదేశం యొక్క అద్భుతమైన సంస్కృతిని ప్రతిబింబిస్తూ ప్రపంచవ్యాప్తం గా ఒక ప్రత్యేక గుర్తంపును తీసుకువచ్చాయి. అతను రాజ్యసభకు నామినేట్ అయినందుకు నా అభినందనలు.
— Narendra Modi (@narendramodi) July 6, 2022
तिसर्या राज्यसभेच्या उमेदवाराला शुभेच्छा देत पंतप्रधानांनी लिहिले,
वीरेंद्र हेगडे जी समाजसेवेत आघाडीवर आहेत. मला धर्मस्थळ मंदिरात प्रार्थना करण्याची तसेच शिक्षण, संस्कृती आणि आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या मोठ्या कार्याचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली, ते नक्कीच संसदीय कामकाजास समृद्ध करतील.
ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಮಹೋನ್ನತ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಶ್ರೀ ವೀರೇಂದ್ರ ಹೆಗ್ಗಡೆಯವರು ಮುಂಚೂಣಿಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಧರ್ಮಸ್ಥಳದ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಸಲ್ಲಿಸುವ ಅವಕಾಶ ಹಾಗು ಅವರು ಆರೋಗ್ಯ,ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕೈಗೊಂಡಿರುವ ಮಹತ್ತರ ಕಾರ್ಯಗಳಿಗೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗುವ ಅವಕಾಶ ನನಗೆ ಒದಗಿತ್ತು. pic.twitter.com/KwoNdZyW6Z
— Narendra Modi (@narendramodi) July 6, 2022
दुसर्या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी इलैया राजा जी यांच्याबद्दल लिहिले आहे. त्यांनी पिढ्यानपिढ्या लोकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांचं काम अनेक भावनांचे सुंदर चित्रण करते. त्यांचा जीवन प्रवास देखील प्रेरणादायी आहे – ते एका हालाखीच्या परिस्थितीतून वर आले आणि त्याने बरेच काही साध्य केले. त्यांना राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाल्याचा आनंद आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
தலைமுறைகளைக் கடந்து @ilaiyaraaja அவர்களின் அற்புத படைப்பாற்றல் மக்களை மகிழ்வித்து வருகிறது. அவரது இசைப் படைப்புகள் பல்வேறு உணர்வுகளை அழகாக வெளிப்படுத்துவன. pic.twitter.com/qgV1ZlK9lP
— Narendra Modi (@narendramodi) July 6, 2022