TOD Marathi

धावपटू पी टी उषा, प्रसिद्ध संगीतकार इलय राजा, चित्रपट कथा लेखक विजयेंद्र प्रसाद, वीरेंद्र हेगडे यांची राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. या चार जणांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड झालेली आहे. (Hon. President of India appointed P T Usha, members of Rajyasabha ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीटी उषा, व्ही. विजयेंद्र प्रसाद गरु, वीरेंद्र हेगडे आणि इलैया राजा यांचे राज्यसभेसाठी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. (PM Narendra Modi Congratulates newly appointed Rajyasabha members by President of India)

पंतप्रधान मोदी यांनी पीटी उषा यांच्यासाठी ट्वीट करत लिहिले आहे की,

पीटी उषाजी या प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेत. क्रीडा क्षेत्रातील त्यांची कामगिरी सर्वत्र ओळखली जाते, नवोदित खेळाडूंना गेल्या काही वर्षांत मार्गदर्शन करणारे त्यांचे कार्य तितकेच प्रशंसनीय आहे. राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

व्ही. विजयेंद्र प्रसाद गरू यांच्या राज्यसभेसाठी नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी लिहिले की,

व्ही. विजयेंद्र गरू हे अनेक दशकांपासून सर्जनशील जगाशी निगडीत आहेत. त्यांच्या कार्यातून भारताच्या गौरवशाली संस्कृतीचे दर्शन घडले आहे आणि जागतिक स्तरावर त्यांचा ठसा उमटवला आहे. राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

तिसर्‍या राज्यसभेच्या उमेदवाराला शुभेच्छा देत पंतप्रधानांनी लिहिले,

वीरेंद्र हेगडे जी समाजसेवेत आघाडीवर आहेत. मला धर्मस्थळ मंदिरात प्रार्थना करण्याची तसेच शिक्षण, संस्कृती आणि आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या मोठ्या कार्याचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली, ते नक्कीच संसदीय कामकाजास समृद्ध करतील.

दुसर्‍या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी इलैया राजा जी यांच्याबद्दल लिहिले आहे. त्यांनी पिढ्यानपिढ्या लोकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांचं काम अनेक भावनांचे सुंदर चित्रण करते. त्यांचा जीवन प्रवास देखील प्रेरणादायी आहे – ते एका हालाखीच्या परिस्थितीतून वर आले आणि त्याने बरेच काही साध्य केले. त्यांना राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाल्याचा आनंद आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.