मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच ठाण्यात आले. (CM Eknath Shinde came Thane after becoming CM) एकनाथ शिंदे यांनी खारकर आळी, ठाणे येथील आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. आपल्या सावलीत तयार झालेला एक सर्वसामान्य शिवसैनिक आज सत्तेच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेला पाहून त्यांना नक्कीच त्याचा अभिमान वाटला असेल याची मला पूर्ण खात्री असल्याची भावना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
मोठ्या संख्येने जमलेल्या ठाणेकर नागरिक आणि शिवसैनिकांनी दिलेल्या शुभेच्छा आणि आशिर्वादाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकार करत त्यांच्याशी संवाद साधला. प्रथमच ठाण्याला मुख्यमंत्री पद मिळाल्यामुळे यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी व समर्थकांनी जल्लोष करत आनंद साजरा केला. जोरदार शक्तिप्रदर्शन यावेळी करण्यात आलं. जोरदार पाऊसही पडत होता. पहिल्यांदाच ठाणे दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांनी यावेळी संवाद साधताना पुढील मुद्दे मांडले. (Eknath Shinde addressed people of Thane)
◆ मी मुख्यमंत्री असलो तरी तुमच्यातला कार्यकर्ता आहे.
◆ बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचे विचार पुढे नेणार.
◆ बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या आशीर्वादामुळे मी मुख्यमंत्री झालो.
◆ आमचं बंड नसून उठाव आहे.
◆ एकदा शब्द दिला की स्वत:चंही ऐकत नाही.