TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 4 मे 2021 – कोरोना विषाणूने मानवासह आता प्राण्यांमध्येही प्रवेश केल्याचे आढळून आले आहे. हैदराबादच्या प्राणी संग्रहालयातील 8 सिंह कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बाब समोर आली आहे. मात्र, सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीने आतापर्यंत सँपल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती दिलेली नाही.

हैदराबादेतील नेहरू जूलॉजिकल पार्कमधील 8 आशियाई सिंहांना कोरोनाची लागण झालीय. एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, नेहरू जूलॉजिकल पार्कमधील अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केलीय. या सिंहाची RT-PCR चाचणी केल्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीने आतापर्यंत सँपल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती दिलेली नाही.

देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या सुमारे दोन कोटींवर गेली आहे.

मिळालेल्या रिपोर्टनुसार, CCMB या सँपलची जीनोम सिक्वेंसिंग पद्धतीने विस्तृत तपासणी केली जाईल. त्या तून सिंहांना माणसांपासून कोरोनाचा संसर्ग झाला आहे का? याचा तपास करण्यात येईल. इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी अधिकाऱ्यांना सावधगिरी बाळगावी, असे सांगितलं आहे.

त्याचबरोबर तातडीने कोरोना संसर्गित सिंहांवर उपचार सुरू करण्याच्या सूचना केल्यात. प्राणी संग्रहलयातील अधिकाऱ्यांकडून सिंहांच्या फुफ्फुसाचा सिटी स्कॅन केला जाण्याची शक्यता वर्तविली आहे. जेणेकरुन त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला आहे का? याची माहिती मिळेल.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, नेहरू जूलॉजिकल पार्कच्या पीआरओनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लक्षणं दिसून आल्यानंतर प्राण्यांची RT-PCR चाचणी केली आहे. आम्ही अहवाल येण्याची वाट पाहतोय. डॉक्टर सिंहांच्या प्रकृतीचं परिक्षण करताहेत, अशी माहिती दिलीय.

यापूर्वी अन्य देशामध्ये प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र, आता भारतात पहिल्यांदा प्राण्यांना कोरोनाची लागण झाली आहे, असं पाहायला मिळत आहे.

एका इंग्रजी दैनिकाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे 24 एप्रिलला प्राणी संग्रहालयातील केअर टेकर्सना सिंहांना कोरडा खोकला, नाक वाहणं व खाणं जात नसल्याची लक्षणं दिसली. त्यानंतर तातडीने पशुपालन अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली. त्यानंतर सिंहांचा स्वॅब घेतला आणि ते सीसीएमबीला पाठविले.

या दरम्यान, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आशिया खंडातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय असलेलं नेहरू जूलॉजिकल पार्क पर्यटकांसाठी बंद केलं आहे. प्राणी संग्रहालयातील 12 पेक्षा अधिकारी, कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज