मुंबई: स्थानिक नागरी संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण ठेवण्याच्या वटहुकमावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची स्वाक्षरी झाल्यानंतर तसा वटहुकूम जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता येत्या महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत २७ टक्के आरक्षण मिळणार आहे.
नागरी संस्थांमध्ये एकूण राजकीय आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही, अशी सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ही बैठक गेल्या आठवड्यात घेण्यात आली होती. या संदर्भात राज्यपालांनी सही केली आहे. त्यानंतर अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आता ओबीसीना आरक्षण मिळणार असले तरी आता मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती राबवण्याचा निर्णय घेण्यात आला, यावर विरोधकांनी टीका केली असली तरी या संदर्भात राज्यपालांनी ३० सप्टेंबरला मंजूरी दिली आहे.