TOD Marathi

‘वाय’ चित्रपटाचा टीझर आता प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर टीझरमध्ये चित्रपटाची थोडक्यात झलक दाखवण्यात आली आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर ‘वाय’ (Y) या आगामी मराठी चित्रपटाची चर्चा सुरु आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे हिची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं काही दिवसांपूर्वीच पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं. या पोस्टरमध्य मुक्ता हातात मशाल घेऊन उभी असल्याचं पाहायला मिळालं. हे पोस्टर पाहिल्यानंतर या चित्रपटाचं कथानक काही तरी हटके असणार याचा अंदाज प्रेक्षकांना आला. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची असलेली उत्सुकता वाढली. यामध्येच आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शत ‘वाय’ या चित्रपटाचा टीझर मुक्ताने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरमध्ये चित्रपटाची थोडक्यात झलक दाखवण्यात आली आहे. या टीझरमधून मुक्ता हातात मशाल घेऊन नेमकी कोणाशी लढा द्यायला निघाली आहे याचा अंदाज लावता येत आहे