शिवसेनेतील आजवरच्या मोठ्या बंडानंतर पहिल्यांदाच स्वतंत्रपणे असे दोन दसरा मेळावे (Dasara Melava) होणार आहेत. त्यानिमित्ताने जमणाऱ्या लाखोंच्या गर्दीपुढे भाषणाची संधी मिळावी यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,(Shiv Sena chief Uddhav Thackeray) तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या मुख्य भाषणाच्या आधी आपल्याला भाषणाची संधी मिळावी यासाठी ठाकरे (Uddhav Thackeray) व शिंदे (Eknath Shinde)गटातील नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे.
नुकतेच शिवसेना नेतेपद मिळालेले खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा शिवसेनेकडून तर मंत्री गुलाबराव पाटील, रामदास कदम, दीपक केसरकर (Gulabrao Patil, Ramdas Kadam, Deepak Kesarkar) यांचा शिंदे गटाकडून भाषणासाठी विचार सुरू असल्याचे समजते.
पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे (Dasara Melava) होणार आहेत आणि या दोन्ही दसरा मेळाव्यांमध्ये एकीकडे उद्धव ठाकरे तर दूसरीकडे एकनाथ शिंदे हे मुख्य भाषण करणार आहेत. मात्र, यापूर्वी एकच दसरा मेळावा होत होता आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे भाषण करत होते. उद्धव ठाकरेंच्या भाषणापूर्वी कोण कोण भाषण करणार याबद्दलचा एक सर्वसाधारण प्रोटोकॉल ठरलेला असायचा. मात्र, आता दोन गट आहेत, दोन्ही गटांमध्ये मुख्य वक्ते जरी असले तरी त्यांच्या पूर्वी बोलण्यासाठी देखील स्पर्धा असणार आहे. कारण दोन्ही गटांना अपेक्षित आहे की मुख्य भाषणापूर्वी अपेक्षित संदेश, माहिती उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना दिली जावी, त्या प्रकारची वातावरण निर्मिती करण्यात यावी आणि त्यानंतर मुख्य भाषण व्हावं.
कारण यामध्येही दोन दसरा मेळाव्यांमध्ये तुलना होणार आहे. त्यामुळे अर्थातच दोन्ही गटांना आपला दसरा मेळावा हा मोठा आणि आकर्षक आहे यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि त्यामुळेच दोन्ही मेळाव्यांमध्ये मुख्य नेत्यांच्या भाषणांपैकी कोण भाषण करतील याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. शिवसेनेची बाजू नेहमीच मांडणारे खासदार संजय राऊत हे सध्या कोठाडीत आहेत त्यामुळे शिवसेनेच्या वतीने खासदार अरविंद सावंत, भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे, माजीमहापौर किशोरी पेडणेकर (Arvind Sawant, Bhaskar Jadhav, Deputy Leader Sushma Andhare, Mayor Kishori Pednekar) या नेत्यांना कदाचित संधी मिळू शकेल तर शिंदे गटाकडून गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) विरुद्ध भूमिका घेणारे रामदास कदम, आक्रमक भाषण शैलीसाठी प्रसिद्ध असलेले गुलाबराव पाटील, शिंदे गटाची बाजी प्रभावीपणे मांडणारे दीपक केसरकर या नेत्यांना संधी मिळू शकते. त्यामुळे मुख्य नेत्यांच्या भाषणाची जशी चर्चा आहे तशीच त्यांच्या पूर्वी कोण भाषण करणार याची देखील चांगलीच चर्चा सुरु आहे.