TOD Marathi

वाराणसी : ज्ञानवापी मशीद वादाप्रकरणी वाराणसी जिल्हा कोर्टात आज सुनावणी पू्र्ण झाली आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर कोर्टाने आपला निकाल सुरक्षित ठेवला असून मंगळवारी निकाल सुनावणार आहे.

उद्या दुपारी दोन वाजता निकाल येण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ज्ञानवापी मशीद वादाची सुनावणी वाराणसी जिल्हा कोर्टासमोर झाली.

सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्या हिंदू पक्षाने सर्वेक्षणात समोर आलेले साक्षी पुरावे कोर्टाने पाहावेत. त्यानंतर त्यापुढील सुनावणी करावी अशी मागणी केली. तर, मुस्लिम पक्षाने खटल्याच्या वैधतेवर सुनावणीची मागणी केली होती.