बिग बॉस मराठी सीजन ३ प्रचंड गाजला. या शोमध्ये अनेक कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. या शोमुळे यातील सर्व स्पर्धकांना एक नवी ओळख मिळाली आहे. त्यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग देखील निर्माण झाला आहे. या शोचा महाविजेता विशाल निकम (VISHHAL NIKAM) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. कामाबद्दल असेल किंवा पर्सनल आयुष्याबद्दल काहींना काही शेअर करत असतो. नुकताच त्यांने त्याच्या भावासोबत एक रावडी व्हिडिओ शेअर केला आहे. एवढचं नाही तर व्हिडिओला दिलेली कप्शन देखील रावडी आहे.
View this post on Instagram
सध्या या कॅप्शनची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगलेली आहे. विशाल निकमनं इन्स्टावर त्याच्या भावासोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दोघेही भाऊ निळ्या रंगाच्या कुर्त्यात दिसत आहेत. दोघांचा यात वेगळाचा स्वॅग पाहायला मिळत आहेत. विशालनं हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, भाऊ हा शब्द उलटा वाचला की “उभा” जो चांगल्या आणि वाईट परिस्थितीत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो तोच आपला भाऊ !