TOD Marathi

मुंबई: विराट कोहली ने शनिवारी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार पदावरून माघार घेतली. विराटच्या या निर्णयामुळे चोहोबाजूंनी यावर प्रतिक्रिया उमटल्या. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने कौतुकास्पद कामगिरी केली, अशा शब्दांत काहींनी त्याचे कौतुक केले, तर काहींनी दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर तो नेतृत्व सोडेल हे अपेक्षित होते, असेही काहीजण म्हटले. याप्रसंगी भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी त्यांचं मत व्यक्त करताना म्हटले की, याआधी त्याने टी-२०, वन डे क्रिकेट संघ, आयपीएल संघाच्या नेतृत्व पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता आणि विराट कोहलीच्या डोक्यावर नेतृत्व जाण्याची टांगती तलवार असते तेव्हा तो नेतृत्व सोडून देतो, असेही त्यांनी म्हटले आहे. फलंदाजीतही विराटकडून धावा होत नाही आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सुनील गावसकर यांनी विराटच्या या निर्णयाबाबत आपले मत व्यक्त करताना म्हणाले, विराटच्या निर्णयाचे मला आश्‍चर्य वाटले नाही. मालिकेनंतर बक्षीस वितरण सोहळ्यात तो कसोटी क्रिकेटचे नेतृत्व सोडेल असे वाटले होते. पण दक्षिण आफ्रिकेतील मालिका पराभवाचा राग त्याच्या मनामध्ये असावा. यामुळे निर्णयासाठी विलंब केला, असे पुढे ते म्हणाले.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने तिन्ही प्रकारांत प्रगती केली आहे. त्याने घेतलेला निर्णय हा वैयक्तिक आहे. त्याचा आम्ही आदर करतो. पण यापुढेही तो संघाचा सदस्य असेल.