TOD Marathi

T20 World Cup च्या आधी भारताला मोठी बातमी मिळाली. स्टार फलंदाज विराट कोहली(virat kohli) फॉर्मात आला.आशिया चषक 2022 मध्ये कोहलीने पाच डावात तीनदा 50 च्या वर धावा केल्या. स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध (Afghanistan) शतक झळकावून फॉर्ममध्ये परतल्याचे घोषित केले. माजी भारतीय कर्णधाराने 1020 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले आणि जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली. टी-20 विश्वचषकात विराटच्या या फॉर्मसह मैदानात परत उतरण्याची सर्वांनाच अपेक्षा आहे. यासाठी 33 वर्षीय कोहलीसाठी तंदुरुस्त राहणे खूप महत्त्वाचे आहे.

टी-20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) भारतीय संघाला सहा टी-20 सामन्यांच्या दोन मालिका आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाला पुढील एक महिन्यातील नऊ दिवस मैदानावर स्पर्धात्मक सामने खेळावे लागणार आहेत. म्हणजेच ऑस्ट्रेलियात (Australia) ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेपूर्वी खेळाडूंना विश्रांती घेण्याची फारशी संधी मिळणार नाही. अशा परिस्थितीत, व्यवस्थापन संघातील महत्त्वाच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेऊ शकते.

विराट कोहली जवळपास ४० दिवसांच्या विश्रांतीनंतर आशिया कपसाठी संघात परतला आहे. अशा स्थितीत टी-20 विश्वचषकापूर्वी त्याला इतक्या लवकर विश्रांतीची गरज आहे का? याचे उत्तर देण्यासाठी, कोहलीची मुलाखत पुन्हा पहा ज्यात त्याने सांगितले की तो आता उत्साही आणि आक्रमक असल्याचे ढोंग करू शकत नाही.