TOD Marathi

Vinkrat Gojamgunde यांचा देशातील 3 सर्वोत्कृष्ट महापौरमध्ये समावेश ; ‘यावर’ करणार Guide

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, लातूर, 27 ऑगस्ट 2021 – देशातील तीन सर्वोत्कृष्ट महापौरमध्ये विक्रांत गोजमगुंडे यांचा समावेश झाला आहे. प्रजातंत्र 2021 या अनोख्या महोत्सवाअंतर्गत आयोजित कार्यकमामध्ये देशातील हे 3 सर्वोत्कृष्ट महापौर ‘मॉडेल शहर, व्यवस्थापन’ बाबत मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्यासह श्रीनगरचे जुनैद अजीम मत्तू आणि दक्षिण दिल्लीचे महापौर मुकेश सूर्यन यांचा समावेश आहे.

प्रजातंत्र २०२१ हा लोकशाहीमधील एक अनोखा व्हर्च्युअल उत्सव असून या अंतर्गत आयोजित उपक्रमात देशातील २१ राज्य आणि ३० शहरांसह ६७ विद्यापीठातील विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला आहे. ‘मॉडेल शहर व्यवस्थापन’ हा विषय घेऊन हा उपक्रम राबविला आहे. त्याअंतर्गत आयोजित स्पर्धतून निवड केलेल्या विद्यार्थ्याना तीनही महापौर मार्गदर्शन करणार आहेत.

लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी शहर व्यवस्थापनात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड केली आहे. विविध फेऱ्यांनंतर आता दि.२८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ११.४५ या कालावधीत या तिन्ही महापौर ‘मॉडेल शहर व्यवस्थापन’बाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच त्यांचे याबाबतचे विचार विद्यार्थ्याना ऐकता येणार आहेत.  (Zoom App) झूम ऍपच्या माध्यमातून यात सहभागी होता येणार आहे.

  • कार्यक्रमाची रूपरेषा –
    याच्या अंतिम फेरीमध्ये लातूरचे उपक्रमशील महापौर विक्रांत गोजमगुंडे यांची मार्गदर्शन करण्यासाठी निवड केली आहे. त्यांचे विचार,आजवर केलेले काम,राबवलेल्या योजना यासंबंधी विचार देशातील विद्यार्थ्याना ऐकता येणार आहेत. त्यांच्यासमवेत श्रीनगरचे जुनैद अजीम मत्तू आणि दक्षिणी दिल्लीचे महापौर मुकेश सूर्यन यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. दिल्ली विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या आत्माराम सनातनधर्म महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अमित सिंग हे यावेळी समन्वयकाची भूमिका भूमिका बजावणार आहेत.

हाच लातूरकरांचा सन्मान –
देशातील अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील महापौरांमधून लातूरचे प्रथम नागरिक विक्रांत गोजमगुंडे यांनी निवड झाली असून आजपर्यंत त्यांनी केलेल्या कामाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली आहे. हाच प्रत्येक लातूरकराचा सन्मान आहे.