TOD Marathi

गेली १० दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुका आणखी सुरु आहेत तर पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतीचं विसर्जन संपन्न झालंय. गेली २ वर्ष कोरोनाच्या सावटामुळे आगमन मिरवणुका आणि विसर्जन मिरवणुकांचा थाट पाहायला मिळालेला नव्हता. पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे हे कायम चर्चेत राहणारे नेते आहे.आपल्या खट्याळ स्वभावामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या राज ठाकरेंच्या  (Raj Thackeray) आदेशाला विरोध केल्याने वसंत मोरे (Vasant More) राज्यभर चर्चेचा मुद्दा बनले होते. त्यात सद्या आता वसंत मोरेंचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये ते चंद्रा या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. आणि तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वसंत मोरे यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये ते गणपतीच्या विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुकीत ट्रॅक्टरवर उभारून डान्स करताना दिसत आहे. चंद्रमुखी सिनेमातील अभिनेत्री अमृता खानविलकरच्या चंद्रा या गाण्यावर वसंत मोरे डान्स करत आहेत. तसेच, यामध्ये ते हाताने बाण सोडतानाचा हावभाव करत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नागरिकांनी वसंत मोरे यांच्या या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट चा वर्षाव केला आहे.

दरम्यान, कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता. मात्र, यंदा मुंबई, पुणे यासोबत महाराष्ट्रात गणरायाचे थाटामाटात आगमन झाले. तर, शुक्रवारी गणेश विसर्जन मिरणुकीचा भक्तांनी मनमुराद आनंद लुटला. ढोल, ताशा, डीजेच्या गजरात गणरायाला अखेरचा निरोप देण्यात आला.