टिओडी मराठी, लखनऊ, दि. 7 सप्टेंबर 2021 – केंद्रीय मंत्री नारायण राणे लखनऊला गेले होते त्यावेळी लखनऊमधील मालमत्ता विभागाच्या वाहनचालकाला नारायण राणे यांच्या वाहनावर ड्यूटी लावली होती. ड्यूटीवेळी या वाहनचालकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप केले आहेत. अशोक कुमार वर्मा असे वाहनचालकाचं नाव आहे.
अशोक वर्मा लखनऊमधील मालमत्ता विभागात वाहनचालकाचे काम करत होते. जेव्हा नारायण राणे लखनऊमध्ये आले होते, तेव्हा अशोक कुमार वैद्यकीय रजेवर होते. मात्र, तरी देखील त्यांची ड्यूटी लावली. अशोक यांच्या प्रकृतीबाबत माहिती असताना हि मालमत्ता वाहन विभागाच्या प्रमुखांनी अशोक यांना फोन केला आणि बोलावून घेतलं.
अशोक यांना रजेवर असताना बोलवलं होतं जर आले नाही तर निलंबित केलं जाईल, अशी धमकी हि मालमत्ता वाहन विभागाचे प्रमुख अमरीश श्रीवास्तव यांनी दिली होती, असा आरोप अशोक यांच्या पत्नीने केलाय. ड्यूटीदरम्यान अशोक वर्माचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना अधिकाऱ्याच्या वाहनातून रुग्णालयात उपचारासाठी नेलं मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाहनावर ड्युटी असताना अशोक यांची ड्यूटी लावली होती. मात्र, अशोक यांची पत्नी रजनी वर्मा यांनी उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री सुरेश राणा यांचे नाव घेतलं आहे. याबाबत तक्रार दाखल करुन घेतली आहे. आता याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.