नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मल सीतारामन आज गुरुवारी दि. १६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ च्या दरम्यान एक महत्वाची परिषद घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकारपरिषदेत अर्थमंत्र्यांकडून अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे वर्तवण्यात येत आहे. यामुळे या परिषदेकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे. वाढती महागाई आणि वाढते पेट्रोलचे भाव यामुळे सामान्य नागरिक हैराण झालेला आहे, त्यामुळे सामान्य माणूस देखील या परिषदेकडे मोठ्या आशेने बघत आहे.
या पत्रकारपरिषदेत सध्याचा मोठा प्रश्न म्हणजेच वाढते पेट्रोलचे दर या मुद्द्यावर सीतारामन पेट्रोल जीएसटीच्या कक्षेत येणार की नाही, या विषयी बोलणार आहेत. या परिषदेत डबघाईला आलेल्या बँकांसंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळात झालेली चर्चा आणि त्यावर निघालेल्या निर्णयाचीही माहिती यावेळी मिळेल. १७ सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत पेट्रोल आणि डिझेल जीएसटी अंतर्गत आणण्यासंदर्भात महत्त्वाची निर्णय होऊ शकतो.
१७ सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेची महत्त्वाची बैठक होणार आहे त्यामुळे आजच्या पत्रकारपरिषदेत एखादी महत्त्वाची घोषणा होण्याचा अंदाज तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. जीएसटीच्या कक्षेत पेट्रोल आणि डिझेल आल्यास महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) वरील मंत्र्यांचे पॅनेल पेट्रोलियम उत्पादनांवर राष्ट्रीय पातळीवर एक कर लावण्याचा विचार करु शकतं. मात्र, राज्य सरकारांचे प्रतिनिधी काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.