TOD Marathi

प्रियाने सांगितला सुखी संसाराचा कानमंत्र! वाचा काय म्हणते प्रिया

मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक क्युट कपल म्हणजे अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) आणि अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) यांची जोडी लोकप्रिय कपलपैकी एक आहे. प्रिया आणि उमेश दोघेही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. या दोघांचीही केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना अतिशय आवडते. या दोघांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते मात्र नेहमीच उत्सुक असतात. उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. दरम्यान आता प्रियाने नुकताच एक धम्माल व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियानं आपल्या यशस्वी वैवाहिक जीवनाचं सीक्रेट सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

प्रिया बापट हिने इंस्टाग्रामवर तिचा नवरा उमेश कामतसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. “तुमच्या दोघांमध्ये सर्वात आधी सॉरी कोण बोलते” त्यावर प्रिया उमेशकडे हात दाखवत म्हणते, “की जो चुकीचा असतो तो” आणि हसू लागतो. हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शन लिहिले की, सुखी संसारामागचे सीक्रेट, सॉरी बोला. प्रिया आणि उमेशच्या या मजेशीर व्हिडीओला चाहत्यांची भरपुर पसंती मिळताना दिसते आहे.

प्रिया बापट आणि उमेश कामतने एकूण सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नबेडीत अडकले. ते दोघे एकाच इंडस्ट्रीत असल्याने खूप अगोदरपासून एकमेकांचे घट्ट मित्र होते. काही दिवसांनी हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.