सध्या पाच राज्याच्या निवडणुकीसाठी सगळेच पक्ष प्रयत्न करताना दिसत आहेत. यातच माहाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी तेलंगणामध्ये जाऊन पक्षाचा प्रचार केला आणि यावरुनच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात १ लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं. उत्तर महाराष्ट्रात गारपिटीमुळे अनेक पिकांचं नुकसान झालंय. कांद्याचं नुकसान झालं. मीसुद्धा अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो. काही गोष्टी मुख्यमंत्र्यांना बसल्या जागी येतात. त्यांनी राज्यातील परिस्थितीबाबत माहिती मागवली पाहिजे. आज जे मुख्यमंत्री स्वतःचं घर सोडून दुसऱ्याचं घर धुंडाळतात. तेलंगणात जाऊन ते कोणत्या भाषेत बोलणार? सुरत गुवाहाटीचा चोरटेप्रकार त्या लोकांना सांगणार आहेत का? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे.
यावेळी बोलताना त्यांनी शिंदेंच्या शेतीचा देखील उल्लेख केला आहे. त टीका केली की हे लोक लगेच गळे काढतात की गरीब शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला. पण यांची पंचताराांकित शेती आहे. ते तिथे हेलिकॉप्टरने पोहोचतात. अशी पंचतारांकित शेती राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या वाट्याला येऊदेत. पण आपला गरीब बिचारा शेतकरी त्याची पायवाट तुडवत शेतीत जातो. शेतकऱ्याच्या पुत्राला शेतकऱ्याची चिंता का वाटत नाही? असाही सवालही त्यांनी विचारला.