TOD Marathi

मुबंई :

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (75th Independence Day) साजरा केला जात आहे. मोदी सरकार हर घर तिरंगा ही मोहीम राबवत आहे. या मोहिमे अंतर्गत घराघरांवर तिरंगा फडकवला जाणार आहे. मात्र, केंद्र सरकारच्या याच मोहिमेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी हल्लाबोल केला आहे. ‘75 वर्षे झाली घराचा पत्ता नाही आणि हर घर तिरंगा’ असे म्हणतात. एका व्यंग चित्राचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर(Modi Govt) निशाणा साधला आहे.

 

सरकार मायबाप… हरघर तिरंगा. घर घर तिरंगा. त्यावर एक व्यंगचित्रं काढलंय. कुणी काढलं माहीत नाही. सरकारी बाबूच्या समोर एक माणूस आहे. तो म्हणतोय सर याच्याकडे तिरंगा आहे. पण घर नाही. त्याला घर हवं आहे, असं हे कार्टुन आहे. म्हणजे घराचा नाही पत्ता, 75 वर्ष झाली आहे. घर घर तिरंगा. लावा. तुमच्याकडे घरच नाही तर तिरंगा लावणार कुठे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

मी कुणावर कॉमेंट करावी म्हणून व्यंगचित्रं दाखवत नाही. 1978 सालीचं हे व्यंगचित्रं आहे. त्यावेळी मोरारजी देसाई देशाचे पंतप्रधान होते. तो काळ भोगलेला वर्ग आहे. त्यांना तो काळ आठवत असेल तर हे त्यांना हे व्यंगचित्रं समजेल असेही उद्धव ठाकरे म्हणाले.