TOD Marathi

उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला आहे. राजकारणात सगळं सहन करा. मात्र, धोका सहन करू नका. ठाकरेंना आपल्याला जमीन दाखवायचीय. असं मोठं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुंबई दौऱ्यावर असताना केलं होतं. त्यावर आता उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर पलटवार केला आहे. (Uddhav Thackeray comments over Amit Shah)

निष्ठा कधीच विकली जात नाही. आपल्याला जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना आसमान दाखवू, असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांनी अमित शहा यांच्यावर पलटवार केला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना शिवसेना- भाजपमध्ये हा कलगीतुरा रंगल्याचे चित्र आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल मुंबई दौऱ्यावर होते. दरम्यान मुंबई भाजपच्या कोअर (Mumbai BJP core committee meeting) कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. या बैठकीदरम्यान बोलत असताना अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला उद्धव ठाकरेंनी आज प्रतिउत्तर दिले अमित शहा यांना प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदेंवर देखील उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्ष टीका केली आहे. नासलेल्या लोकांपेक्षा मुठभर निष्ठावंत कधीही बरे, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

सोबतच दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार असा पुनरोच्चार देखील उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळे दसरा मेळाव्यावरुन पुन्हा एकदा संघर्ष रंगण्याची शक्यता आहे.