TOD Marathi

मुंबई: “लढायचे असेल तर सोबत राहा. भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ. (Uddhav Thackeray addressed Shivsena Jilha Pramukh in meeting) आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल”. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा असं आव्हान माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं.

उद्धव ठाकरेंनी यावेळी घटनातज्ज्ञांना विनंती केली. ते म्हणाले की, “आपण घटनातज्ञ आहात. सध्या जे सुरु आहे ते घटनेला धरून सुरु आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडा. (Uddhav Thackeray appealed Constitution expert to speak)

 

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याबाबत सर्वाना सत्य बोलू द्या. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या समोर व्यक्त केलेले ठळक मुद्दे

◆ लढायचे असेल तर सोबत राहा.
◆ भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव.
◆ हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा.
◆ असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ, आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल. १
◆ तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल.
◆ घटनातज्ज्ञांना विनंती आहे आपण घटनातज्ञ आहात, सध्या जे सुरु आहे ते घटनेला धरून१ सुरु आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडा.
◆ देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याबाबत सर्वाना सत्य बोलू द्या.
◆ विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान.