टिओडी मराठी, दि. 2 जून 2021 – ज्याप्रमाणे पश्चिम घाट हा संशोधनासाठी महत्वाचा मानला जातो. त्याप्रमाणे पूर्वेकडील जंगल देखील संशोधनासाठी महत्वाचे आहे. यात अनेक जीवसृष्टीबाबत संशोधन करता येत आहे. मिझोरम राज्यातील एक भागात ‘आफ्रिकन वायलेट’ हि दुर्मीळ वनस्पती आढळली आहे.
भोपाळच्या संशोधकांनी मिझोरम आणि म्यानमारच्या काही भागात पहिल्यांदा ‘आफ्रिकन वायलेट’ची नवी जात शोधलीय.
‘डिडिमोकार्पस विकिफंकी’ असे या जातीचे नाव असून ती खूप दुर्मीळ आहे. सध्यातरी मिझोरममधील केवळ तीन ठिकाणी या जातीची वनस्पती आढळत आहे.
भोपाळच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड एज्युकेशन अँड रिसर्चच्या संशोधकांनी केलेला अभ्यास सिस्टमॅटीक बॉटन या विज्ञानपत्रिकेत प्रकाशित झालाय.
त्याचे प्रकाशन अमेरिकन सोसायटी ऑफ प्लांट टेक्सोनॉमिस्टद्वारे केलं जात आहे. ईशान्येकडील राज्ये देखील जैवविविधतेने संपन्न आहेत. तिथे अनेक वनस्पती आढळत आहेत. त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे, असे प्रा. विनिता गौडा यांनी सांगितले.
(African Violet )’आफ्रिकन वायलेट’ची माहिती :
मिझोरम इथे सापडलेली ‘आफ्रिकन वायलेट’ ही वनस्पती झाडांवर उगवते. पावसाळ्यामध्ये त्यांना फिकट गुलाबी रंगाची फुले येतात.
अमेरिकेचे स्मिथसोनियन इन्सिट्यूटचे दिवंगत वनस्पती शास्त्रज्ञ विकी एन फंक यांच्या नावावरून या वनस्पतीला ‘डिडिमोकार्पस विकिफंकी’ असे नाव दिले आहे.