TOD Marathi

सर्वोच्च न्यायालयानं ( Supreme Court )  विवाहाशिवाय  जन्माला आलेल्या मुलांचाही वडिलांच्या संपत्तीत हक्क असल्याचा निकाल नुकताच दिला आहे. जर स्त्री आणि पुरुष अधिक काळ एकत्र राहत असतील, तर ते लग्न मानले जाईल आणि या नात्यातून जन्मलेल्या मुलांनाही वडिलांच्या मालमत्तेत हक्क मिळणार असल्याचा निर्णय कोर्टानं एका खटल्या दरम्यान दिला आहे.

केरळ उच्च न्यायालयानं ( Kerala High Court ) एका केसदरम्यान तरुणाला त्याच्या वडिलांच्या मालमत्तेत वाटेकरी मानलं नव्हतं. कारण त्याच्या पालकांचे लग्न झाले नव्हतं. दोघांचे लग्न झाले नसले तरी दोघेही पती-पत्नीसारखे  दीर्घकाळ एकत्र राहत असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आता स्पष्ट केलंय. अशा परिस्थितीत मूल दोघांचे असल्याचं डीएनए चाचणीत ( DNA Test ) सिद्ध झाल्यास वडिलांच्या मालमत्तेवर मुलाचा पूर्ण हक्क आहे. (The child born in a live-in relationship will also get a share in the father’s property )

दरम्यान वडिलांच्या मालमत्तेत वाटा न मिळाल्याने केरळमधील एका व्यक्तीने उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता.  त्याने याचिका दाखल करताना म्हटले होते की, त्याला अनैतिक मुलगा सांगून वाटा वडिलांच्या संपत्तीत दिला जात नाही. केरळ उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले होते की, ज्या व्यक्तीच्या मालमत्तेवर तो दावा करत आहे, त्याच्या आईने त्याच्याशी लग्न केलेले नाही, अशा परिस्थितीत त्याला कौटुंबिक मालमत्तेचा हक्क समजता येणार नाही.