दिल्लीत 15 August पूर्वी Terrorist Attack ची वर्तविली शक्यता, Alert जारी !; Read Fort वर 4 अँटी ड्रोन यंत्रणा सज्ज

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 20 जुलै 2021 – भारताची देशाची राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानची दहशतवादी संघटना दिल्लीमध्ये हल्ला करण्याची योजना आखत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीमदहये सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट जारी केलाय. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याची मोहीम दहशतवादी संघटनांनी आखली आहे, अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे.

सुरक्षा यंत्रणांना मिळालेली माहिती अशी, स्वातंत्र्य दिनापूर्वी दिल्लीत ड्रोनच्या माध्यमातून हल्ला घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे. संबंधित माहिती मिळताच संपूर्ण दिल्लीमध्ये अलर्ट जारी केला आहे. सुरक्षा व्यवस्थेत कमालीची वाढ केली आहे. सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहे.

५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे याच दिवशी हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे. दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनाही आता दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खास ट्रेनिंग दिलं आहे. यात सॉफ्ट किल, हार्ड किल व इतर ट्रेनिंगचा समावेश आहे.

ड्रोनद्वारे हल्ल्याची होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळताच भारतीय हवाई दलाच्या मुख्यालयात एक विशेष ड्रोन कंट्रोल रुम तयार केली आहे. तसेच सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर ४ अँटी ड्रोन यंत्रणा तैनात केली आहे.

काही दिवसांपूर्वी लखनऊमधून अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशी दरम्यान अनेक महत्वाचे खुलासे झाले आहेत, असे सांगण्यात येत आहे. अल कायदाकडून मोठ्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखली जात होती, अशी माहिती चौकशीतून समोर आली होती.

Please follow and like us: