TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 12 मे 2021 – कोरोनाचा संसर्ग वाढू नये आणि इतरांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून मास्क घालण्याचे आवाहन, वारंवार प्रशासनाकडून केली जात होते. मात्र, काहींनी याकडे दुर्लक्ष करून मास्क न वापरात बेफामपणे फिरत असताना आढळले. अशांना दंड करून त्यांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आहे. मुंबईत मागील वर्षभरात सुमारे 54 कोटींचा दंड मास्क न घालणाऱ्याकडून वसूल केला आहे. तर, पुण्यात 17 कोटी 85 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मुंबई व पुण्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाते. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक केले आहे. पण, असं असलं तरी काही लोकं मास्क वापरत नाहीत. अशा लोकांकडून पालिकांनी ‘क्लीन अप मार्शल’ मार्फत दंड गोळा केलाय.

मुंबई महापालिकेकडून संपूर्ण वर्षभरात मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात केलेल्या कार्यवाहीत 54 कोटी रुपये गोळा केलेत. मुंबईत मास्क न वापरणाऱ्या विरोधात 200 रुपये दंडाची कारवाई केली जात आहे. ‘क्लीन अप मार्शल’मार्फत ही कारवाई केली जाते आहे. आता पोलीस कर्मचाऱ्यांना ही कारवाई करण्याचा अधिकार दिला आहे.

मुंबईत रेल्वेत, शहर परिसरात क्लीन अप मार्शल व पोलीस यांच्या मार्फत कारवाई होते. तिन्ही रेल्वे लाईनवर प्रत्येकी 100 या प्रमाणे 300 मार्शल लावले आहेत. तर, पुण्यात पुणे पोलिसांनी वर्षभरात मास्क न घालणाऱ्या सुमारे 3 लाख 54 हजार 969 पुणेकरांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

त्यांच्याकडून 17 कोटी 85 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरात दररोज विना मास्क फिरणारे किमान दोन ते तीन हजार नागरिक पोलिसांना दिसत आहे. पोलिसांकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारलाय.